

बेळगाव : म्हैसूर येथील ऐतिहासिक जंबो सवारी मिरवणुकीत एकूण ५८ स्थिरचित्रांनी मिरवणुकीत भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील श्री महाकाली मायाक्कादेवी मंदिर चिंचलीची देवस्थानची खासियत दर्शविणाऱ्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
ऐतिहासिक जम्बो सवारी मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या, बेळगावच्या चित्ररथात, मायाक्का मंदिराचा इतिहास, देवीचे महत्त्व आणि देवी झोपलेल्या पाणथळ जागेची प्रतिमा स्थिरचित्रात दाखवण्यात आली होती. या चित्ररथाने मोठ्या संख्येने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या संदर्भात बोलताना बी.एस. गस्ती म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथील श्री मायाक्का देवी मंदिराचा चित्ररथासाठी कलाकारांच्या एका विशेष पथकाने परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta