

बेळगाव : कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या १२० व्या पुण्यतिथी सोहळ्याला बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे.या सोहळ्याची श्री दत्त संस्थान वतीने जय्यत तयारी सुरू आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ८ वाजता श्रीपंत वाडा समादेवी गल्ली बेळगाव येथून प्रेमध्वज मिरवणूक काढण्यात येईल. बेळगाव शहरातून मार्गाक्रमण करत सांबरा रोड मार्गे प्रेमध्वज मिरवणूक दुपारी २ वाजेपर्यंत श्री पंत बाळेकुंद्री येथील वाड्यापर्यंत पोहोचेल. सायंकाळी पाच वाजता श्री पंत वाडा येथून प्रेमध्वज मिरवणूक निघेल व रात्री आठ वाजता प्रेम ध्वजारोहण होऊन उत्सवाला सुरुवात होईल.
गुरुवार दिनांक ९ रोजी पहाटे पाच वाजता श्रींचा पुण्यस्मरण कार्यक्रम होईल सकाळी सात वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघून दोन प्रहरी आमराईतील श्रीपंत स्थानी येईल व रात्री आठ ते बारा या वेळेत पालखी सेवा होईल.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक दहा रोजी दुपारी बारा वाजता श्रींचा महाप्रसाद होईल दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होईल सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी अमराईतील पूज्य स्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचेल व उत्सवाची सांगता होईल भक्तांनी या पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त संस्थान वतीने करण्यात आले आहे.
पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर व आमराई परिसरात स्वच्छता व रंगकाम सुरू आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या यासोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती असते. तीन दिवसांच्या काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या वाहनांच्या गर्दीची दखल घेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta