

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जिल्ह्यात सर्वच उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी बोरगाव येथी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी गुरुवारी (ता.९) मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उत्तम पाटील म्हणाले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीद्वारे मी सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याचे ध्येय बाळगले आहे. पारदर्शक व जबाबदार प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून त्यांचे जीवनमान उचलणार आहे. यापूर्वी बोरगाव कृषीपतीन संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मंजूर करून शेतकऱ्यांना दिली आहे. त्यामुळे राज्यात ही संस्था राज्यात अव्वल ठरल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी आमदार प्रा.सुभाष जोशी, उद्योजक युवा अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजीत उर्फ निकु पाटील, के. एस. आर. टी. सी. उपाध्यक्ष सुनील हनमन्नावर, माजी जिल्हा पंचाययत उपाध्यक्ष पंकज पाटील, संजय शिंत्रे, सुजय पाटील, वैभव पाटील, बाबुराव खोत, अमर स्वामी, अरुण निकाडे, निपाणी नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, मतदारसंघातील आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, व उत्तम पाटील प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta