

चिक्कोडी : कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीला कारमध्ये बसवून पेटवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. चिक्कोडी तालुक्यातील पोगात्यानट्टी गावात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील पोगात्यानट्टी गावात कौटुंबिक वादाने गंभीर वळण घेत एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील प्रगतीशील शेतकरी शिवगौडा पाटील यांच्या पत्नी सावित्री यांनी पती आणि मुलगा प्रज्वल यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर, प्रगतीशील शेतकरी शिवगौडा पाटील यांना कारमध्ये बसवून गाडीला आग लावून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर, शिवगौडा पाटील यांच्या तक्रारीवरून चिक्कोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पडताळणी केली आहे. हा गुन्हा चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आला असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या कृत्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta