Sunday , July 26 2026
Breaking News

संविधानाचा अपमान करणाऱ्या माथेफिरूवर कारवाई करा

Spread the love

 

ऑल इंडिया पँथर सेनेसह दलित संघटनांची मागणी; उपतहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : सर्वोच्च न्यायालयामध्ये माथेफिरू आणि मनोवादी विचारधारेचा वकील किशोर राकेश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर बूट फेकण्याचा निधनीय प्रकार करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. या या घटनेमुळे भारतीय संविधानाचा अवमान झाला आहे. त्यामुळे राकेश तिवारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निपाणी तालुका ऑल इंडिया पँथर सेना आणि विविध दलित संघटनांनी केला आहे. याबाबतचे निवेदन उप तहसीलदार मृत्युंजय डंगी यांना गुरुवारी देण्यात आले.
प्रारंभी नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. संदीप माने, सुधाकर माने, प्रा. जे. डी. कांबळे, विवेक कांबळे, लोकेश गस्ते, सुशील कांबळे, अस्लम शिकलगार, नगरसेवक रवी श्रीखंडे, लक्ष्मण वाघे, सुनील कांबळे, यांच्यासह मानवरांनी मनोगत व्यक्त करून कारवाईची मागणी केली.
यावेळी गणू गोसावी, अरेश सनदी, पिंटू माने, जनार्दन मोहिते, संतोष मेस्त्री, विजय कांबळे, अजित कांबळे, बाबुराव माने, बबन भोसले, यासीन मनेर, ईश्वर शिंदे, रमेश मधाळे, संतोष कांबळे, राजू मुल्ला, मोहसिन बेपारी, भूषण कांबळे, सनी माने, राहुल लाटकर, सुरज कांबळे, नितीन कांबळे, यल्लाप्पा माने, रवी कांबळे सोन्या कांबळे यांच्यासह ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी विविध दलित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *