Monday , September 21 2026
Breaking News

“काळा दिन” पाळण्यास परवानगी नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

बेळगाव : यंदा कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी “काळा दिन” पाळण्यास परवानगी नसल्याचे प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. राज्योत्सवाच्या नियोजना संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आयोजित बैठकीत स्पष्ट केले की, महाराष्ट्र एकीकरण समितीला राज्योत्सवाच्या दिवशी काळा दिन पाळण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही. याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्योत्सव हा सौहार्द, ऐक्य आणि सकारात्मकतेचा दिवस आहे या दिवशी कोणत्याही राज्य विरोधी उपक्रमाला स्थान नाही. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, लवकरच कर्नाटक संबंधित संघटना तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे व राज्योत्सव शांततेत पार काढण्यासाठी रूपरेषा आखण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, राज्योत्सव दिन हा आनंद ऐक्य व सकारात्मकतेत साजरा करावा. कोणत्याही प्रकारची वादग्रस्त हालचाल झाल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्यासह पोलीस खात्याचे अधिकारी व कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *