

बेळगाव : बेळगावसह उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी गांधीनगर येथील मारुती नगर पहिल्या गल्लीमध्ये आराध्या उमेश तरगर (वय वर्ष 2) या चिमुकल्या बालिकेवर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले आहे. या हल्ल्यात सदर बालिकेच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शंकर पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि जखमी बालिकेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र तेथे योग्य उपचार न मिळाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे लहान मुले व अबालवृद्धांना घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा संतप्त इशारा मारुती नगर गांधीनगर परिसरातील नागरिकांनी यावेळी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta