Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक : अरविंद पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल!

Spread the love

 

खानापूर : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचे वारे सध्या जोरात सुरू आहे. बेळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी अनेक दिग्गज मंडळींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी देखील आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेले अरविंद पाटील आज अर्ज दाखल करीत असताना तालुक्यातील विविध सोसायटीचे अध्यक्ष, कार्यकर्ते, समर्थक, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच गर्लगुंजी पीकेपीएसचे चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते राजू सिद्धाणी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजू सिद्धाणी यांच्या उमेदवारी अर्जामुळे खानापूर तालुक्यातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत अरविंद पाटील यांना 54 पैकी 48 कृषी पतसंस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार का चुरशीची होणार याकडे तालुक्याचे लक्ष आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयुर्वेदिक व्यावसायिकाला खंडणीची धमकी; २० लाखांची मागणी केल्याचा आरोप

Spread the love  बेळगाव : शहरातील रामलिंग खिंड गल्ली परिसरात राहणाऱ्या एका आयुर्वेदिक व्यावसायिकाला २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *