

बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी समारंभात महाप्रसादाने आणि पंत महाराजांच्या श्री पालखीने सोहळ्याची सांगता मोठा उत्साहात झाली. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचा नैवद्य दाखवण्यात आला. यानंतर दत्तारती व यमुनाक्का भजनी मंडळाच्या महिलांनी आरती म्हटली. यावेळी यावेळी श्रीदत्त संस्थांचे अध्यक्ष राजन पंत बाळेकुंद्री, संजीव पंत, डॉ. संजय पंत, अभिजीत पंत, रुपा पंत, सुखदा पंत, अनघा पंत, रेखा पंत, अनंत किल्लेकर, डॉ. महेंद्र राणे, भरत सायनेकर, भूषण सायनेकर, वैभव सायनेकर, अवधूत सायनेकर, सुनंदा किल्लेकर, अथर्व किलेकर, सुषमा सायनेकर, गीता पाटील, लता जमखंडीकर आदींसह शेकडो भक्त उपस्थित होते. दुपारी प्रेमानंद टिपरी कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचली व उत्सवाची सांगता भक्तीभवानी करण्यात आली. यात्रेनिमित्त पंत बाळेकुंद्रीत विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे व विविध खेळ थाटण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी कर्नाटक राज्य परिवहन मंडळातर्फे बेळगाव ते बाळेकुंद्री अशी थेट व्यवस्था केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta