

बेळगाव: शहरातील काही सहकारी संस्था बंद पडल्यामुळे सदस्यांनी जमा केलेली ठेव रक्कम, बचत केलेले पैसे आणि इतर स्त्रोतांद्वारे केलेली गुंतवणूक परत मिळवण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बेळगावच्या कन्नड साहित्य भवन येथे एका महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेमध्ये द बेळगाव डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल ग्रोअर्स, परचेसर्स, सेलर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., (फोर्ट रोड, बेळगाव), बेळगाव होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., (कामत गल्ली, बेळगाव), कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सोसायटी (महाद्वार रोड, बेळगाव) तीन संस्थांच्या ग्राहकांनी/सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta