Monday , September 21 2026
Breaking News

समगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कारासाठी आवाहन

Spread the love

 

बेळगाव : समगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य समगर विकास संघातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहेत. संघाचे सचिव चंद्रकांत पुजारी यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ जाहीर करण्यात आलेल्या प्रतिभा पुरस्काराने विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

2024-25 मधील एसएसएलसी, सीबीएससी दहावी, पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या शरण हरळया समाजातील गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपले अर्ज जे के कांबळे किंवा शंकर वक्कुंद यांच्याकडे 17 नोव्हेंबर पूर्वी सुपूर्द करावेत. रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेहरूनगर येथील कन्नड भवन येथे प्रतिभा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *