अध्यक्ष पदी अशोक चिंडक तर सेक्रेटरीपदी संजय झंवर यांची निवड
बेळगाव : शहापूर येथील श्री व्यापारी मित्र मंडळाच्या श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने यंदा कोरोना नियमावलीचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवासंदर्भात चर्चाविमर्ष करण्यासाठी रविवार दि.1 ऑगस्ट रोजी मंडळाच्या सभासदांची बैठक बोलविण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
4 फूट उंचीची गणेशमूर्ती आणून नार्वेकर गल्ली, शहापूर येथील माहेश्वरी भवन भाग क्रमांक 2 मध्ये मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेताना फटाक्यांच्या आतषबाजीला पूर्णतः फाटा देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत यावर्षीसाठी मागील वर्षीच्या कार्यकारिणीचीच निवड करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून अशोक चिंडक, सेक्रेटरीपदी संजय झंवर, उपसेक्रेटरी म्हणून संजय ओझा तर खजिनदारपदी राहुल बंग यांची पुनर्निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी राजू राठी, गिरीश चिंडक, आशीष बंग, गजानन झंवर, उमेश चिंडक, दिनेश शर्मा, महेश हेडा, बाळूसाहेब जोशी, रघुवीर जोशी, मनीष लाहोटी, भगीरथ ओझा, किरण ओझा, चंदूभाऊ शिंदे, संजय पुजारी, दिनेश कामत आदी सभासद उपस्थित होते.