बेळगाव : घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरू असलेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली आहे.
हिना कौसर नदाफ (वय 24) रा. चिंच मार्केट उज्वल नगर बेळगाव असे या मयत महिलेचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडलेल्या या खून नाट्याचा थरार पहाण्यासाठी शेकडो गर्दी केली होती. आपल्या पत्नीचा धारधार शास्त्राने खून करून पती घटनास्थळीच होता. त्याचे नाव मंजूर इलाही नदाफ (वय 35) असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल यावर व्हायरल झाला होता. घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हिना कौसर या उज्वल नगर येथे राहत होत्या त्यांचा बैलहोंगल येथील मंजूर याच्याशी विवाह झाला होता. दोघांच्यात भांडण झाल्याने कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणीही झाली होती अशी माहिती मिळाली असून नेमकं खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.
शुक्रवारी झालेल्या कोर्टातील सुनावणीच्या तारखेला दोघेही पती-पत्नी हजर झाले होते. त्यानंतर पतीने हिना कौसरचा पाठलाग करीत किल्ला तलावाजवळ धारदार शस्त्राने भोसकून खून केला. खून केल्यावर आरोपी पती घटनास्थळीचं उभा होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किल्ला तलाव खून प्रकरणी माळमारुती पोलीस पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलिस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करत आहेत.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …