Wednesday , March 4 2026
Breaking News

विना परवाना बेकायदेशीर दारू विक्री करणारे दोघे अटकेत

Spread the love

 

बेळगाव : विना परवाना गोवा राज्यातील दारू साठवल्या प्रकरणी 50 हजार रुपये किंमतीची दारू एक दुचाकी जप्त केली असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

मल्लगौड गिडगेरी, वय 25 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हिंग, मूळचे हुदली हाळी, सध्या राहणार महाद्वार रोड बेळगाव तसेच यतीराज रामचंद्र परदे, वय 28 वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. तानाजी गल्ली अशी या प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर भागात, दोन व्यक्ती मोटारसायकलवरून गोवा राज्यात विक्रीसाठी नेण्यासाठी परवाना नसलेली दारू बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली असता मार्केट पोलीस ठाण्याचे पीआय महांतेश धामण्णवार व पीएसआय विठ्ठल हावन्नावर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पथक तयार करून छापा टाकला. या छाप्यात पल्सर एनएस 125 मोटारसायकल (क्रमांक केए-22 एच एम-19467) वरून दारूच्या बाटल्या वाहतूक करत असलेल्या दोघा आरोपींना पकडण्यात आले.

पोलीस त्या दोघांनी चौकशीत त्यांनी सांगितले की त्यांनी शहापूर, महात्मा फुले रोड, हुलबट्टी कॉलनी येथील एका खोलीत दारूचा साठा ठेवलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण 128 लिटर 250 मिलीलीटर दारू (किंमत ₹50,680/-) तसेच पल्सर मोटारसायकल (किंमत ₹50,000/-) जप्त केली. आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *