

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सिद्धार्थ अधिकारी याची कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट (KSCA) उत्तर कर्नाटक, धारवाड विभागाच्या १६ वर्षांखालील संघात निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धार्थचे हे यश त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ आहे. शालेय एस्.एम.सी. कमिटीचे चेअरमन ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर.एस्. पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे, शाळेच्या ऍडव्हायझरी डायरेक्टर श्रीमती मायादेवी अगसगेकर तसेच शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी सिद्धार्थच्या पुढील क्रिकेट प्रवासासाठी अनेक शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta