Thursday , June 4 2026
Breaking News

महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांना काँग्रेस, समिती नगरसेवकांचा पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : महानगरपालिकेच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या बदलीची शिफारस केली असली तरी हा निर्णय कोणत्या निकषावर घेतला गेला आहे याचे स्पष्टीकरण मागत काँग्रेस नगरसेवकांसह समिती नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात काँग्रेससह विरोधी गटातील नगरसेवकांच्या गटाने महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनाचा स्वीकार करत आयुक्त शुभा बी. म्हणाल्या की, महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या विरोधातील ठराव हा केवळ एका मताच्या फरकाने मंजूर झाला आहे. याबाबत शासन स्तरावर चौकशी होऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. यापूर्वी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी याबाबत महानगरपालिकेत आंदोलन केले होते त्यांना ठरावाची प्रत देण्यात येणार असून त्यानंतरच नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खाऊकट्टा संदर्भात विचारणा केली असता महानगरपालिका आयुक्त म्हणाल्या की, महानगरपालिकेचे वकील न्यायालयात आपली बाजू मांडत आहेत. याबाबत संबंधित अधिकारी आपापली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडतील अशी अपेक्षा आहे. शासनाच्या चौकशीनंतर सत्य समोर येईलच असे देखील आयुक्त शुभा यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *