
बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भारताचे राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून अधिक महत्त्व आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या शुभ दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी व वृत्तपत्रे वितरण करणारे मान्यवर यांच्या उपस्थितीत संस्थेने समारंभ आयोजित केला आहे.
निवडक दहा विद्यार्थी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर विचार व्यक्त करणार आहेत. तसेच गेली बेचाळीस वर्षे वयाच्या बाराव्या वर्षापासून वृत्तपत्रे वितरण करणारे राजा
भोसले यांचा सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर बी देसाई उपस्थित रहाणार आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम फोटो पूजन मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते केले जाईल. तसेच हभप शिवाजी जाधव, बिजगर्णी ग्रामपंचायत उपाध्यक्ष ऍड नामदेव मोरे, जोतिबा बा. मोरे, भाग्यश्री कदम, दीपा जो. मोरे, तेजस्विनी कांबळे, संस्था अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या प्रमुख उपस्थित जयंती साजरी करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोमल गावडे, मनोहर प. मोरे, सूरज कणबरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta