Monday , April 20 2026
Breaking News

युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल; माळमारुती पोलीस ठाण्यात चौकशी

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागात समिती कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाची पुन्हा एकदा करडी नजर पडली असून नुकताच युवा नेते शुभम शेळके यांना माळ मारुती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आहे.

कन्नड रक्षण वेदिकचा म्होरक्या नारायण गौडा याने बेळगावात येऊन मराठी भाषिकानी काळादिन पाळला तर बेळगाव हे रणभूमी होईल असे सांगत मराठी जनतेने बेळगाव सोडावे असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला सोमवारी शुभम शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. माळमारुती पोलीस याबाबत शेळके यांची चौकशी करीत आहेत या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही परंतु प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली असून सीमा भागात मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठी भाषिकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच बेळगाव शहरात नारायण गौडा यांनी प्रक्षोभक व शांतता भंग करणारे वक्तव्य केले होते मात्र प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही मात्र मराठी भाषिक असणाऱ्या शुभम शेळके यांनी त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले असता शुभम शेळके यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याने मराठी भाषेत नाराजी पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *