

बेळगाव : एका सामाजिक कार्यकर्त्याचे वडील जीवन मृत्यूच्या झुंजेत अतिदक्षता विभागात असताना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यांच्यावर हल्ल्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत आंबेवडकर यांचे वडील रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी औषध आणण्यासाठी मेडिकलकडे जात असताना त्यांचे काका नारायण आंबेवडकर निवृत्त शिक्षक राहणार गडहिंग्लज आणि त्यांचे भाऊ रामकृष्ण आंबेवाडकर राहणार बेळगाव यांनी कोणत्याही कारणाशिवाय शशिकांत आंबेवडकर यांच्यावर हल्ला केला.
घटनेनंतर विचारणा केल्यावर आरोपींनी कोणतेही कारण सांगितले नाही तसेच माफी मागण्यासही नकार दिला. या अमानुष कृत्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत आंबेवाडकर संबंधित पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta