

बेळगाव : कर्नाटकचे कायदा आणि संसदीय मंत्री एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत सीमा प्रश्न संपल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एक नोव्हेंबर राज्योत्सव दिन हा केवळ भाषिक नव्हे तर कर्नाटक राज्याचा गौरवशाली उत्सव आहे. कन्नड संस्कृती आणि भाषा टिकविण्यासाठी सरकार सर्वतोपरी कटिबद्ध आहे असे सांगत बेळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या काळ्या दिनावर कारवाईचा इशारा देत ते म्हणाले की, एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी जर कोणी काळा दिवस आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल असे सांगतात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा अन्य कोणत्याही संघटना ब्यान करण्याचा प्रस्ताव किंवा विचार सरकार समोर नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बेळगावात हिवाळी अधिवेशन सुवर्णसौध येथे होणार असून राज्य सरकारकडून त्या बाबतची तयारी सुरू असल्याचे देखील सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta