

बेळगाव : यावर्षी देशातील अनेक राज्यात महापुरामुळे शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत गरजांपासून माणसे दुरावली गेली. अशा संकटग्रस्त, पूरग्रस्त परिस्थितीतील बांधवांसाठी मदतीचा हात देण्यासाठी दिनांक २ ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्त मदतनिधीसाठी शाळा ते महात्मा गांधी चौक (आरगन तलाव) पर्यंत संवेदना फेरी काढण्यात आली आणि मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन पूरग्रस्तांसाठी 1,00,000/ रुपयाचा निधी शाळेमध्ये जमा केला. हा मदतनिधी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी दैनिक सकाळच्या “सकाळ रिलीफ फंडाकडे’ मा.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर,उपाध्यक्ष सुरेश पाटील, सदस्य किरण पाटील, मुख्याध्यापक बी. जी. पाटील प्राथमिक विभाग, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर माध्यमिक विभाग, माजी विद्यार्थी शुभम अतिवाडकर, संयोजिका नीला आपटे, समन्वयक सविता पवार, पूर्व प्राथमिक प्रमुख गौरी चौगुले, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते दैनिक सकाळचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन मुगळी, उदय होनगेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी दैनिक सकाळचे प्रतिनिधी मल्लीकार्जुन मुगळी यांनी शाळा करत असलेल्या उपक्रम विषयी कौतुक करून पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या भरघोस मदतनिधीविषयी आभार व्यक्त करुन शाळा सुधारणा समिती, विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले.


Belgaum Varta Belgaum Varta