Monday , September 21 2026
Breaking News

मिनी अलिंपिक अथलेटिक्स स्पर्धेची निवड चाचणी संपन्न

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी जिल्हा अथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही निवड चाचणी जिल्हा स्टेडियम, नेहरू नगर, बेळगाव या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण 100 हून अधिक खेळाडूनी सहभाग घेतला होता त्यात एकूण 10 खेळाडूंना निवडले गेले. त्यात सक्षम कुंभार 100 मी 200 मी., 4×100 मी रिले विराज कुगजी 400 मी 4×100 मी रिले अनोज हंनगोजी 400 मी 600 मी 4×100 मी रिले प्रार्थ कणबरकर थाळी फेक आणि मुलींमध्ये जोस्तना हंजिरकर 100 मी. 200 मी 4×100 रिले माधुरी पाटील 200 मी 400 मी 4×100 स्नेहल नाईक 600 मी 4×100 समीक्षा कर्तसरकर 200 मी 400 मी 4×100 मी रिले सेजल धामणेकर लांब उडी, उंच उडी 4×100 रिले व राखिव म्हणून ऋतुजा जाधव भला फेक म्हणून निवड केली गेली.

6 ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान श्री कंटेरवा स्टेडियम बेंगळुरू येथे राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या प्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगांव जिल्हा एथलेटिक्स असोसिशन बेळगांवचे अध्यक्ष किरण जाधव त्याच बरोबर उपाध्यक्ष संभाजी देसाई, सचिव अशोक शिंत्रे, क्रीडा भारती कर्नाटक प्रांत सह कार्यवाह विश्वास पवार व कार्यक्रमाचे सचिव म्हणून डॉ. मधुकर देसाई या सर्व मान्यवरानी निवड चाचणी व स्पर्ध्येचे उद्घाटन केले. अशोक शिंत्रे यांनी प्रस्तावना व स्पर्धेची माहिती दिली. किरण जाधव यांनी अध्यक्षीय भाषण म्हणून खेळाडूंना मार्गदर्शन केले व उमेश बेळगुंदकर यांनी आभार व्यक्त केला व स्पर्धेला चालना दिली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिरीष सांबरेकर, महेश मोरे, अनंत पाटील, सूरज पाटील, वैभव गडकरी, आकाश लाड, मयुरी पिंगट, ऐश्वर्या नेसरकर, या प्रसंगी उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना प्रमाण पत्र आणि पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्कृष्ट धावपटू म्हणून मुलांमध्ये सक्षम कुंभार व मुलींमध्ये माधुरी पाटील या दोघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *