

बेळगाव : बेळगाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रगतीशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर विवेकाचा, या मालिकेत डॉ. महान्तेश रामन्नावर यांचे “देह दान हे श्रेष्ठ दान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
गिरीश संकुलनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे हे होते.
प्रारंभी पत्रकार अनिल अजगावकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले तर प्रा. आनंद मेणसे यांनी पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अंनिस बेळगाव शाखेचे सचिव जोतिबा अगसीमनी यांनी पाहुण्यांचा यथोचित परिचय करुन दिला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. महान्तेश रामन्नावर यांनी देहदान व अवयव दान या विषयी उद्बबोदक अशी माहिती श्रोत्यांना दिली. यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर कार्यक्रमातश श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी समर्पक उत्तरे देऊन श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रा. आनंद मेणसे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी कॉ. नागेश सातेरी, उपाध्यक्ष पी. एस. चौगुले, अर्जुन ओऊळकर, मधू पाटील, सूर्याजी पाटील, अर्जुन सावगावकर, शिवाजी हसनेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सागर मरगाणाचे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta