Tuesday , March 3 2026
Breaking News

१ नोव्हेंबर २०२३ काळा दिनप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

Spread the love

बेळगाव : 1 नोव्हेंबर 2023 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर भारतीय दंड सहित कलम 142, ,147,153,290 सह कलम 149 प्रमाणे त्यांच्या वर मार्केट पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 14 नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी 9 जणांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होत. जेएमएफसी कोर्ट क्रमांक 2, बेळगाव येथे हा खटला सुरू असून, सीसी केस क्र. 2917/2024 मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी 18 डिसेंबर 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीत मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, रवी साळुंखे, वैशाली भातखांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, नेताजी जाधव, विकास कलघटगी यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला.
या खटल्याचे काम ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. एम.बी. बोंद्रे, ॲड. वैभव कुट्रे आणि ॲड. अश्वजीत चौधरी यांनी पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *