

बेळगाव : येथील लिंगराज कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय आणि लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग आणि प्रेमचंद क्लबच्या संयुक्त विद्यमानाने वतीने कवि संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव येथील सुप्रसिद्ध कवी आणि यरगट्टी येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय हिंदी विभागाचे प्राध्यापक श्री. विवेक दिवटे लाभले. हे संमेलन लिंगराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.
या वेळी कवी श्री. विवेक दिवटे म्हणाले की, कविता ही समाजाचे प्रतिबिंब असते. आपण कविता एकतो आणि ती आपल्या हृदयात राहते.कविता ही केवळ शब्दांची रचना नसून, ती भावनांची अभिव्यक्ती आहे. ती मनुष्याच्या मनातील आनंद, दु:ख, आशा, प्रेम, वेदना आणि स्वप्नं या सगळ्यांना शब्दरूप देते. मोबाइल संस्कृतीमध्ये कवि संमेलन आयोजित करणे हे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या पलीकडे विचार करायला प्रवृत्त करणारे आणि मनाला स्पर्श करणारे उपक्रम आहे. या वेळी व्यासपीठावर लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. कलावती निंबाळकर, प्रा.सीमा जनवाडे आणि लिंगराज महाविद्यालयाचे हिंदी विभाग अध्यक्ष डॉ.अर्जुन कांबळे उपस्थित होते. या वेळी त्यांनी अनेक कविता सादर केल्या. डॉ. कलावती निंबाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले. स्वागत भाषण प्रा.सीमा जनवाडे यांनी केले.
या वेळी महाविद्यालयातील कु.सिमरन बागवान, कु.पूष्पा नायक,कु. हनीन पठाण, कु. मसिहा इनामदार, कु. यशोदा, कु. दीपीठा राठोड, कु. तनाज, कु. संगीता एडके या विद्यार्थ्यांनी नारी, संस्कृति, संस्कार, जीवन अशा विविध विषयांवर आपली कवितांनी रंग भरले. सभागृहात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कवींना दाद दिली. या संमेलनाची सुरुवात कु.सारिका पाटिल हिच्या स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. सिमरन बागवान हिने केला. या संमेलनाचे सूत्रसंचालन कु. सिमरन बागवान आणि कु. मसिहा इनामदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. पुष्पा नायक हिने केले. या वेळी मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कवि संमेलनाच्या सफलतेसाठी कु रोनाल्डो, कु. अभिषेक गाडीवड्डर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta