Thursday , June 4 2026
Breaking News

मलप्रभा नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेला नागरिकांनी वाचवले

Spread the love

 

खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिलेला नागरिकांनी वेळीच रोखले आणि त्यांना खानापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
या वृद्ध महिलेला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती सांगता येत नाहीये किंवा त्या आपले नावही सांगत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटत नाहीये. त्यांची ओळख पटल्यास नागरिकांनी तात्काळ खानापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा पोलीस ठाण्यात येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *