

बेळगाव : मुळचे येळ्ळूर येथील आणि भाग्यनगर ९ वा क्रॉस येथील रहिवासी शामराव नाना पाटील यांचे पहाटे ३:१५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे.
निधनानंतर लागलीच त्यांच्या कुटुंबीयांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाविषयी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार केएलई नेत्रपेढीच्या डॉ बाळेश मऱ्याप्पगोळ आणि डॉ श्रेया नागमोटी यांनी प्रक्रिया पूर्ण केली.
यासाठी डॉ सुरेखा आणि डॉ अनिल पोटे यांचे सहकार्य लाभले.
त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार असून प्रत्येकाने नेत्रदान चळवळीचा भाग व्हावा असे मदन बामणे
यांनी सांगून पाटील कुटुंबियांचे आभार मानले.
शामराव पाटील हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाई पाचगणी व महाबळेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते कालकुंद्रीकर कुटुंबियांचे जावई होत.
त्यांच्यावर शहापूर वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे
Belgaum Varta Belgaum Varta