बेळगाव : ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे शहरातील चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आज सकाळी पार पडला.
ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आज सकाळी विविध प्रकारच्या झाडांची 100 हून अधिक रोपे लावण्यात आली. चव्हाट गल्ली पंच कमिटीच्या उपस्थितीत सकाळी 6 वाजता या वृक्षारोपण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सदर उपक्रमात ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. ग्रीन सेव्हीयरचे युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करताना दिसत होते. या सर्वांनी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत स्मशानभूमीमध्ये जवळपास 100 हून अधिक रोपांची लागवड केली.
चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये या पद्धतीने जवळपास दीड ते दोन हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आहे. यासाठी वृक्षारोपणाचा हा उपक्रम दर रविवारी राबविला जाणार आहे.
तरी या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्याशी (मो. क्र. 9880089798) संपर्क साधावा, असे आवाहन सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे.