

बेळगाव : चिकोडी शहरातील बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत वेळ घालवत असलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले आणि भररस्त्यात चप्पलने चोपवल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले नावाचा विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये आला होता. याची माहिती पत्नीला मिळताच तिने थेट लॉज गाठले आणि त्याला पकडले. संतापलेल्या पत्नीने पतीच्या कॉलरला धरून चप्पलांनी मारहाण केली. या घटनेत पत्नीच्या मामानेही साथ देत पतीची चांगलीच धुलाई केली.
घटनास्थळी झालेल्या गोंधळामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण प्रकार परिसरात चर्चेचा विषय बनला असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
Belgaum Varta Belgaum Varta