
बेळगाव : बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील सिग्नलवर आज सकाळी ११ वा. सुमारास भिक्षुकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच उत्तर वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला अटक केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या अपघातानंतर कोल्हापूर सर्कल परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या मते, येथे सिग्नल वारंवार बंद पडतात किंवा काही वेळासाठी बंद ठेवले जातात, ज्यामुळे वाहनचालक गोंधळात पुढे निघून जातात.
Belgaum Varta Belgaum Varta