
बेळगाव : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांना कर्नाटक सरकारचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराने बेळगाव येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला आहे!
मराठा मंडळ ही कर्नाटकातील भाषिक अल्पसंख्याक अग्रगण्य शिक्षण संस्था असून अध्यक्षा डाॅक्टर राजश्रीताई नागराजू यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली या संस्थेने चौफेर प्रगती साधली आहे. येथील शिस्त आणि शैक्षणिक वाटचाल वाखाणण्याजोगी जोगी असून शहरासह खेडोपाड्यात उभारलेली विविध शैक्षणिक दालनं बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आकर्षण केंद्र बनले असून दर्जेदार शिक्षण, कला. क्रीडा आणि संस्थेने राबवलेले लोकोपयोगी सामाजिक उपक्रम यांचा सारासार विचार करून कर्नाटक सरकारने हा पुरस्कार आपल्या अधिकृत पत्रात जाहीर केला असून हा पुरस्कार बेंगळोर मुक्कामी मान्यवरांच्या हस्ते बहाल केला जाणार आहे.
या पुरस्कारामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेत नवचैतन्य संचारले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta