Thursday , June 4 2026
Breaking News

बालिका आदर्श विद्यालयाचा कबड्डी संघाचा विभागीय स्पर्धेत दुसरा क्रमांक

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बागलकोट यांच्या वतीने बेळगाव विभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धा जमखंडी तालुक्यातील चिमर्ड येथे संपन्न झाल्या. यामध्ये माध्यमिक गटात बालिका आदर्श विद्यालयाने उपांत्य सामन्यात सिरशी जिल्ह्याला 17-21 अशा फरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना बागलकोट सोबत झाला यामध्ये 10-19 अशा फरकाने पराभव पत्करला व दुसरा क्रमांक मिळवला व बालिका आदर्श विद्यालयाच्या 3 खेळाडूंची दिया मोहिते, श्रद्धा पाटील, मनस्वी बिर्जे, या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू बेळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत ही सदर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बेंगळूर या ठिकाणी 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2025 या दरम्यान पार पडणार आहेत. या संघात गव्हर्नमेंट सरदार विद्यालयाची खेळाडू लक्ष्मी राठोड व बालिका आदर्श विद्यालाचे 6 खेळाडू श्रावणी पाटील, श्रद्धा पाटील, मनस्वी बिर्जे दिया मोहिते, अंजली कटगालवकर, स्नेहा बैलूर, या सर्व खेळाडूंचा या संघात समावेश होत. या संघाला शाळेचे चेअरमन आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Spread the love  मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव; राणी चन्नम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *