
येळ्ळूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सामील होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती जे जे लढे पुकारील त्या सर्व लढ्यात येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अग्रभागी असतील. 1 नोव्हेंबर 1956 पासून आजतागायत आपण सर्व जण एक सैनिक म्हणून लढतो आहोत आणि तोच वसा तोच बाणा दाखविण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवून या काळ्या दिनाच्या फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने करण्यात आले आहे. त्याच बरोबर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी सतत पाठपुरावा करून सुप्रीम कोर्टातील याचिका येत्या 21 जानेवरी 2026पासून सतत चालू होणार आहे त्या साठी मध्यवर्ती समितीचे नेते मंडळी आणि विशेष करून दिनेश ओऊळकर साहेब यांचे या पत्रकात अभिनंदन करण्यात आले आहे. सदर पत्रक माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील, प्रकाश अष्टेकर, दता उघाडे, दुद्दापा बागेवाडी, उदय जाधव, राजू पावले, चांगदेव परिट, शिवाजी सायनेकर, सुरज गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट, सतीश देसुरकर, प्रकाश मालुचे, कृष्णा शहापूरकर, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, नागेश बोबाटे, भोला पाखरे, प्रदिप देसाई, यल्लुपा पाटील, गणेश अष्टेकर, म्हात्रु लोहार, भिमराव पुण्ण्याणावर, जोतिबा परीट, समीर परीट, मधु पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta