Tuesday , March 3 2026
Breaking News

भाविपच्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्या रायचूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता त्यांची पुढील आठवड्यात तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. बेळगाव शाखेअंतर्गत झालेल्या समूहगीत स्पर्धेत सहभागी 21 शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
विजेत्या समूहात अद्विती शेठ, त्रिशाना मित्रा, रिषिका कोंगवाड, राघवी गस्ती, अदिती उंगेर, आकांक्षा नाईक, लाईबाह के., हृत्विका कंग्राळकर यांचा सहभाग होता. त्यांना संगीत शिक्षक विनायक मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत वरिष्ठ विभागात बेळगावच्या भरतेश इंग्रजी माध्यम शाळेचे विद्यार्थी प्रसन्ना ए. आणि यश धर्मोजी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर कनिष्ठ विभागात संत मीरा स्कूल हिंडलगाच्या विघ्नेश मन्नुरकर व वैष्णव मनवाडकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन खास गौरविण्यात आले.
रायचूर येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी पुरुषोत्तमदास इनानी, प्रांत अध्यक्ष एस. एस. हिरेमठ, डॉ. आनंदतीर्थ फडणीस, संघटन सचिव विनायक घोडेकर, बेळगाव शाखाध्यक्ष विनायक मोरे, तिरुपती जोशी, स्वामीराव देशपांडे, अक्षता मोरे तसेच सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. भारत विकास परिषद बेळगाव शाखेच्यावतीने विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी सदिच्छा देण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *