Tuesday , March 3 2026
Breaking News

राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान चाकू हल्ला; सहा जण जखमी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरातील सदाशिव नगर परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी तिघांना बीम्स रुग्णालयात तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना बेळगावातील सदाशिवनगर परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ घडली आहे राज्योत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ मिरवणुकीदरम्यान अचानक काही हल्लेखोरांनी चाकू व जांबिया घेऊन गर्दीत घुसून हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. जखमींची नावे गुरुनाथ वक्कुंद, सचिन कांबळे, लोकेश बेटगेरी, महेश, विनायक आणि नझीर पठाण अशी आहेत. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *