Tuesday , March 3 2026
Breaking News

युवा नेते शुभम शेळके यांच्यासोबतची सेल्फी पोलिस निरीक्षकांच्या अडचणीची

Spread the love

 

बेळगाव : म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वाचा मोह पोलिस निरीक्षक कालिमिर्ची यांनादेखील आवरला नसून शेळके यांच्यासोबत सेल्फी काढल्याने निरीक्षक कालिमिर्ची यांनी कानडी लोकांचा तीव्र रोष ओढवून घेतला आहे.

कर्नाटक राज्योत्सवाच्या वेळी ‘काळा दिवस’ साजरा करण्यासाठी म. ए. समितीला परवानगी नाकारल्याबद्दल कानडी नागरिक आधीच जिल्हा प्रशासनावर नाराज होते. त्यात आता माळमारुती पोलीस स्टेशनचे निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांनी म. ए. समितीच्या निर्भीड युवा नेत्यासोबत सेल्फी घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ‘काळा दिवस’ रॅलीच्या बंदोबस्तासाठी गेलेले निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांनी शुभम शेळके यांच्याशी अत्यंत सलगीने बोलून, जाताना स्वतःचा मोबाईल काढून “मीच यांच्यासोबत सेल्फी घेतो,” असे म्हटले. या घटनेमुळे जरी कन्नड भाषिक नागरिकांचा जळफळाट होत असला तरी शुभम शेळके यांच्यासारख्या निर्भीड व्यक्तिमत्वाच्या नेत्यासमवेत सेल्फी घेण्याचा मोह निरिकक्षकांना देखील आवरता आला नाही, हे हि तितकेच खरे आहे, अशी चर्चा मराठी भाषिकांमध्ये रंगत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *