
येळ्ळूर : येळ्ळूर जलाशयात (अरवाळी धरण) मुलगा पोहण्यासाठी उतरला होता. पण पोहता पोहता 18 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. ही घटना रविवारी सायंकाळी 5-6 वाजता घडली होती.
पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरु केला होता. अखेर मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. नितीन शिवराम पाटील (वय 18, रा. धामणे एस. ता. बेळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलगा धरणात पोहण्यासाठी उतरला होता. मुलगा खोल पाण्यात गेल्याने तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. याची माहिती ग्रामस्थांसह पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एच ई आर एफ रेस्क्यू टीम पोलीस आणि ग्रामस्थांच्या वतीने बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात होता. अखेर आज सोमवारी सकाळी जलाशयात मुलाचा मृतदेह आढळला.
Belgaum Varta Belgaum Varta