
बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन ए. के.पी फौंडर्सचे श्री. राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते तर अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे संचालक पी. आर. गोरल हे होते.
श्री. राम भंडारे यांनी आपल्या उद्योग समूहातर्फे यापूर्वी विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृह बांधून दिले होते त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाची गरज प्रतिपादन करण्यात आली होती ही गोष्ट लक्षात घेऊन श्री. भंडारे यांनी विद्यार्थ्यांसाठीही स्वच्छता गृह बांधून दिले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. भंडारी म्हणाले की, “प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, शिक्षित झाला पाहिजे व आपले ज्ञान व कौशल्य देश विकासासाठी तसेच समाज कार्यासाठी खर्च केले पाहिजे.”
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. स्मिता मुतगेकर यांनी केल्यानंतर श्री. राम भंडारे यांचा सत्कार पी आर गोरल यांच्या हस्ते करण्यात आला. हे स्वच्छतागृह पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेले अभियंता मयूर गडकरी यांचा आणि अनंत लाड यांचाही सत्कार करण्यात आला.
कॉलेजची विद्यार्थिनी सुकृती लोहार हिने कॉलेजला स्वच्छता गृह बांधून दिल्याबद्दल ए. के. पी. फाउंड्रीज प्रा. लि.चे आभार मानले.
प्रमुख वक्ते अनंत लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी माणूस स्वकर्तृत्वाने मोठा होतो. कष्ट वाया कधी जात नाहीत. प्रत्येकाने संकटाला सामोरे गेले पाहिजे, गेलेला वेळ परत येत नाही हे लक्षात घेऊन वेळ वाया घालवू नका असे सांगून अनेक उद्योजकांच्या यशाची उदाहरणे दिली. अध्यक्षीय समारोप पी. आर. गोरल यांनी केला. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य अनंत देसाई, सातप्पा दडिंन, प्राचार्या एम. एच. पवार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी आणि आभार प्रदर्शन विजया डिचोळकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta