
बेळगाव : शहापूर पोलिसांनी जुने बेळगाव स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांच्या पथकाला येथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाची स्थापना करून छापा टाकून कारवाई केली. कारवाईत हमीद इनुशा कागजी (वय ४४, होसूर तांबिटकर गल्ली, शहापूर), मोहसीन अब्दुलखादर सदरसोफा (२४, पाटील गल्ली, खासबाग), उमेश कल्लप्पा कन्नूकर (३४, विष्णू गल्ली वडगाव), राहुल बाबू होसुरकर (३०, रा. लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव), उत्तम मनोहर भराटे (३५, रा. महावीरनगर, कपिलेश्वर कॉलनी, बेळगाव) यांना अटक करण्यात आली. पथकाचे — नेतृत्व शहापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक एस. एन. बसवा यांनी केले. संशयितांकडून आठ हजार १५० रुपयांची रोकड आणि अन्य साहित्या जप्त केले आहेत. या प्रकरणाची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta