Sunday , July 26 2026
Breaking News

अपघातात जखमी नागुर्डावाडातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

 

खानापूर : जांबोटी-खानापूर मुख्य रस्त्यावर सोमवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम संजय कुंभार (वय १७, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) या तरुणाचा मंगळवारी (ता. १८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान, धडक देणारा वाहनचालक पसार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सोमवारी सकाळी जांबोटी-खानापूर रोडवरून पायी खानापूरकडे जात होता. नागुर्डावाडा हद्दीतील मोदेकोप्प क्रॉसजवळ वड्डिनावर यांच्या शेताजवळ पोहोचताच जांबोटीकडून येणाऱ्या एका अनोळखी वेगवान वाहनाने त्याला जोराची धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. या धडकेत शिवमच्या डोक्याला आणि शरीराच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तत्काळ त्याला खानापूर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तेथून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *