Tuesday , March 3 2026
Breaking News

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात 19 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक अमावस्या अर्थात देव दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून विधिवत पूजेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळी पहाटे रुद्राभिषेक, विशेष आकर्षक पुष्परचना तसेच लोणी पूजनाने धार्मिक विधीचे सुरुवात करण्यात आली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळीनी सजावट करण्यात आली होती. सायंकाळी सात्विक कला समूहाच्या उपस्थितीत आणि मंदिर ट्रस्टींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात झाली. कपिलेश्वर मंदिर परिसर तसेच विसर्जन तलाव हजारो दीपाने उजळून निघाला होता. रात्रीच्या अंधारात हजारो दिव्यांच्या लखलखाने मंदिर परिसर तेजोमय दिसत होता त्यासोबत आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतिषबाजीने मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय व उत्साहवर्धक झाले होते. आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट त्याचप्रमाणे विद्युत रोषणाईने कपिलेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला होता. रात्री कपिलेश्वर आरती समूहाच्या भक्तीमय किर्तनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी मंदिर ट्रस्टी, सेवेकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *