Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर शिवाजी रोड- मारुती गल्ली कॉर्नर येथे विद्युत बोअरवेल मंजूर

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील वॉर्ड नंबर 4 व 5 मधील शिवाजी रोड मारुती गल्ली कॉर्नर येथील बोअरवेल गेली कित्येक वर्षे हॅन्डपम्प असल्याने वारंवार बंद पडत होती. यामुळे शिवाजी रोड दुकान मालक व स्थानिक नागरिकांनी वॉर्ड क्रमांक 4 चे विद्यमान सदस्य व ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील यांना संपर्क करून समस्या निदर्शनास आणून दिली. ती समस्या जाणून घेऊन तत्काळ ग्राम पंचायत पीडिओ यांना भेटून तेथील समस्या निदर्शनाला आणून देऊन तातडीने जुना हॅन्डपम्प काढून त्याठिकाणी नवीन विद्युत बोअरवेल मोटर मंजूर करून आज गुरुवार दि. 20/11/2025 रोजी ग्राम पंचायत सदस्य सतीश पाटील यांनी स्वतः त्याठिकाणी हजर राहून प्रत्यक्ष तेथील नागरिकांच्या उपस्थितीत काम करून घेऊन बोअरवेलचे पाणी चालू करण्यात आले. तसेच त्या परिसरामध्ये सेंटेक्स टाकी बसून पाण्याची योग्य सोय करण्यात येईल. येथील समस्येचे निवारण करून कायम स्वरुपी समस्या सुटल्यामुळे येथील नागरिकाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *