
बेळगाव : सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांचे शुक्रवार दि. 21 रोजी रात्री निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामा शिंदोळकर हे अनेक मोर्चे, सत्याग्रह आणि आंदोलनांचे सक्रिय सहभागी होते. बेळगावपुरतेच नव्हे तर कोल्हापूर, मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या सीमा आंदोलनातही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली. आंदोलकांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक वेळा कारावासही भोगला, परंतु संघर्षाची ज्योत कधीच मंद पडू दिली नाही.
“सीमा लढ्याचा एक दिशादर्शक झगमगता तारा हरपला; त्यांच्या जिद्दीने हजारो तरुणांमध्ये लढाऊ प्रेरणा निर्माण केली.” अशी भावना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्या शनिवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta