
येळ्ळूर : प्रतिभा करंजी स्पर्धांचे आयोजन हा सरकारचा हेतू विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी खूप चांगला आहे शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांचे हे गुण हेरून त्यांच्या प्रदर्शनाला वाव द्यावा. यातूनच भावी उत्तम कलाकार निर्माण होतील असे उद्गार श्री. वाय. एन. मजुकर यांनी प्रतिभा कारंजी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष भाषणातून काढले.
येळ्ळूर क्लस्टर लेवल प्रतिभा कारंजी स्पर्धा यावर्षी श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे संपन्न झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या इशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सचिव श्री. प्रसाद मजुकर, श्री. चंद्रकांत दादा पाटील, मनोज बेकवाडकर, सामाजिक कार्यकर्ते शुभम नांदवडेकर यांच्या शुभहस्ते झाले. चांगळेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन धर्मस्थळ संघाच्या सेवा प्रतिनिधी सौ. सानिया मिलगे यांच्या हस्ते झाले तर सरस्वती फोटो पूजन उद्योजक श्री. नागराज रतन यांच्या शुभहस्ते झाले.
येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते प्रतिभा कारंजी स्पर्धांचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी स्पर्धांचा हेतू स्पष्ट केला. यानंतर श्री. प्रसाद मजूकर, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, मणतूर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एम. पाटील, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा पर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सी. आर. पी. जळगेकर सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..
या कार्यक्रमाला गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, ज्ञानेश्वर हायस्कूल लोकोळीचे मुख्याध्यापक एस. एम. येळ्ळूरकर, कारलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एम. पाटील, रवळनाथ हायस्कूल शिवठाणचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील, श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरीचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत सर तसेच नेताजी हायस्कूल सुळगेचे मुख्याध्यापक टी. एल. भोगण, श्री भावकेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. ए खोरागडे त्याचप्रमाणे कन्नड शाळेच्या सहशिक्षिका सौ.सृष्टी सुप्पनावर उपस्थित होत्या..
स्पर्धा पार पाडण्यासाठी विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री चांगळेश्वरी हायस्कूलचा शिक्षक वर्ग टी. एस. बोकडेकर, वाय. बी. कंग्राळकर, एम. एम. डोंबले, व्ही. पी. जिवाई व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन एल. एस. बांडगे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta