

बेळगाव : मार्केट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विचल हावन्नवर आणि त्यांच्या पथकाने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे.
बेळगाव शहर बस स्थानकाच्या दिशेने संशयास्पद रित्या वावरणाऱ्या मारुती भीमप्पा नायक (रा. भरमनट्टी, बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ बेकायदेशीररीत्या धारदार लोखंडी चाकू आढळून आला असून पोलिसांनी त्वरित तो चाकू जप्त करून त्याच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta