Thursday , June 4 2026
Breaking News

सीमा तपस्वी कै. रामा शिंदोळकर यांना भावपूर्ण अभिवादन!

Spread the love

 

बेळगाव : शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ज्येष्ठ शिवसैनिक व मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ नेते रामा शिंदोळकर यांच्या निधनानिमित्त आज शिवसेना कार्यालय, बेळगाव येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

या शोकसभेला शिवसेना बेळगाव जिल्हाध्यक्ष व उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेनेचे महेश टंकसाळे, माजी नगरसेवक अनिल पाटील, युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके, मनोहर हुंदरे, ज्येष्ठ नेते यल्लाप्पा मुचंडीकर, राजू बोकडे, प्राध्यापक निलेश शिंदे, किसन सुंठकर, विनायक बेळगावकर, महांतेश कोळुचे,।सुनील बोकडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून सीमा भागातील मराठी भाषा, हक्क आणि प्रश्नांसाठी रामा शिंदोळकर यांनी केलेल्या अविरत लढ्याचे स्मरण केले. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि तळमळीच्या कार्याचा उल्लेख करत सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
बेळगावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शोकसभेत सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *