
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक गुरूवार दि. 04/12/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालाय येथे होणार आहे. सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी होणारा महामेळाव्यानिमित्त बैठक होणार आहे. तरी या बैठकीला आजी- माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व सर्व पदाधिकारी, युवा यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष येळ्ळूर विभाग म. ए. समिती यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta