Tuesday , March 3 2026
Breaking News

यावर्षी आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

बेळगाव : पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यावर्षी आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल अशी आशा, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलून दाखवली आहे.
आज मंगळवारी त्यांनी सुवर्णसौध येथील कामकाजाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अधिवेशनाच्या दरम्यान बेळगावात येणाऱ्या मंत्री, अधिकारी तसेच अन्य मान्यवरांसाठी शहरातील विविध ठिकाणी 3000 खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. कायदा सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून 7000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
अधिवेशनापूर्वीच विविध संघ संस्था तसेच ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांबरोबर आम्ही त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली आहे. बऱ्याच आंदोलकांच्या समस्यांचे निवारण केले आहे. ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारनेही त्यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे या वेळच्या अधिवेशनादरम्यान आंदोलनांची तीव्रता कमी दिसून येईल असे त्यांनी बोलून दाखवले.
त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध खात्यांचे अधिकारी एकत्रितपणे काम करत आहेत. सुवर्ण विधानसौध समोर सुंदर बगीचा, कारंजा निर्माण करण्यात आला आहे. याचे मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहे. सायन्स सेंटर उभारण्यात आले आहे. अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे एक आकर्षणाचे केंद्र असेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *