बेळगाव : बेळगावच्या बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट करून सर्वसामान्य जनतेला पूरक अशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमातर्फे आज मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला.
शांताई वृद्धाश्रमांमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन आमदार बेनके यांचा गौरव केला. खाजगी हॉस्पिटलमधील उपचाराचे बिल परवडणारे नसल्यामुळे सर्वसामान्य जनता उपचारासाठी सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणे पसंत करते.
मात्र यापूर्वी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था अतिशय खराब होती. हॉस्पिटलमध्ये अस्वच्छतेचे वातावरण असण्याबरोबरच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची परवड होत होती. परिणामी सर्वसामान्य जनता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यास टाळत होती.
हॉस्पिटलमधील असुविधांमुळे जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र अलीकडच्या काळात आमदार ॲड. अनिल बेनके यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमूलाग्र सुधारणा केली आहे. सर्वसामान्य जनतेला आता या हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आमदार बेनके यांच्या अथक प्रयत्नातून आज बीम्स हॉस्पिटल अर्थात सिव्हिल हॉस्पिटल सुंदर, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी सुसज्ज झाले आहे. यासाठी शांताई वृद्धाश्रमातर्फे आमदार अनिल बेनके यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आमदारांनी आश्रमातील वृद्धांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि कांही मदत लागल्यास आपणास सांगावे, असा दिलासाही दिला.
Check Also
राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत
Spread the love बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते …