
बेळगाव : पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची पुन्हा एकदा मार्केट पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना वादग्रस्त “सेल्फी प्रकरणात” अडकलेले कालीमिर्ची यांनी काही दिवसांपूर्वी सायबर पोलीस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता.
मात्र आता त्यांची सायबर पोलीस स्थानकाच्या लगत असलेल्या बेळगाव शहरातील मार्केट पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या मार्केट पोलीस स्थानकात कार्यरत असलेले महंतेश द्यामन्नावर यांची बेंगळूर येथील लोकायुक्त विभागात बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोमेंदु मुखर्जी यांच्या सहीने या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta